खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या सहकार्यातून २ हजार गरजु व गरीबांना अन्नधान्याचे कीट वाटप!

खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या सहकार्यातून २ हजार गरजु व गरीबांना अन्नधान्याचे कीट वाटप !


शहर भाजपकडून पंतप्रधान निधिस 25 लाख
 रुपये देण्याचा संकल्प 



   लातूर : देशात पसरलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी मुळे अडचणीत सापडलेल्या 2 हजार गरजूंना शहर भाजपाच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. खा. सुधाकरराव शृंगारे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला असून पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या काळात गोरगरीब आणि कष्टकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडत आहे. कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने भाजपाने अत्यावश्यक साहित्य पुरवण्याचे काम सुरू केले आहे. खा. सुधाकरराव शृंगारे यांनी यासाठी सहकार्य केले आहे. त्यांच्या सहकार्यातून 2 हजार  गरजवंतांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू असणारे किट घरपोच दिले जात आहे .भाजपाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि.६  एप्रिल रोजी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे ,मनपातील भाजपा गटनेते शैलेश गोजमगुंडे ,माजी उपमहापौर देविदास काळे ,ॲड. दिग्विजय काथवटे ,मंडळ अध्यक्ष रवी सुडे ,ॲड. ललित तोष्णीवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांचे अभिनंदन करणारी पत्रे देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अशी पत्र दिली जाणार असल्याचे गुरुनाथ मगे यांनी यावेळी सांगितले. देश सध्या आर्थिक संकटात आहे. अशा समयी  पंतप्रधान सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहर भाजपाच्या वतीने २५  लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


मोदी यांच्या आवाहनानुसार भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर झेंडा लावावा ,एक दिवसाचा उपवास करावा ,अशा सुचनाही त्यांनी केल्या .
या कार्यक्रमास संजय गीर ,गणेश हेड्डा ,सतिश ठाकूर , ज्योतीराम चिवडे ,मनिष बंडेवार ,राहूल पाटील ,अमोल गिते ,विपुल गोजमगुंडे ,डॉ. नागोराव बोरगावकर ,पृथ्वीसिंह बायस आदींसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .