राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक



   अहमदपूर : चाकूर तालुक्यातील कोरोना च्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर आढावा बैठक राज्याचे पर्यावरण सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)राज्यमंत्री संजय बनसोडे अहमपुरचे  आमदार  तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.


बैठक जनतेला आरोग्य विषयक सेवा , जीवनावश्यक वस्तू  व रोटेशन चालू असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये शेती कामासाठी लागणारी साहित्याचे दुकाने शासनाने सांगितलेल्या नियमानुसार चालू करावे याबाबतच्या सूचना दिल्या.
 
तालुक्यात किती लोकांना होम कोरंटाइन केले आहे , किती लोकांच्या टेस्ट झाल्या आहेत , रेशन वरील धान्य वाटप व्यवस्थित होत आहे का ? अशा विविध बाबीवर या बैठकीत चर्चा झाली तसेच रोटेशन चालू असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहे . याबाबत सर्व नियम पाळून शेतकऱ्यांना मदत करावी.


कोरोनामुळे परिस्थीती नाजूक झाली असून जनतेला  सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या.
या आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार शिवानंद बिडवे, उपविभागीय अधिकारी (पोलीस ) आश्विनी शेलार, पोलीस निरीक्षक पुजारी, मुख्याधिकारी न प जाधवर,ता वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक, महावितरण उपविभागीय अभियंता काळे ,सावळे, माजी जी प सभापती चंद्रकांत मदे,  कल्याण पाटील,शहराध्यक्ष अजहर बागवान,एलियास सयद,नबी सय्यद,फेरोज शेख,चंद्रशेखर भालेराव, आशिष तोगरे,आदींची उपस्थिती होती .


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image