महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कडून अभिवादन

महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कडून अभिवादन



   लातूर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लाँकडाऊन परिस्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू असून महात्मा बसवेश्वर जयंती पर्यावरण, भूकंप पुनर्वसन ,सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
      या संचार बंदीच्या अनुषंगाने आज जगतज्योती महात्मा बसवेश्वर जंयती नागरिकांनी घरीच साजरी करावी असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर श्री. बनसोडे यांनी घरातच महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. बसवेश्वरानी समतेची,मानवधर्माची शिकवण दिली आहे. आज जगावर कोरोना या रोगाचे संकट उभे राहिले आहे. हे संकट आता आपल्या दारात आले असुुन या संकटाला घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या सुचनांचे पालन प्रत्येकानी करावे असे आवाहन या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
            


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image