जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री पुढील आदेशा पर्यंत बंद

 


जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री पुढील आदेशा पर्यंत बंद


 लातूर : देशात तसेच महाराष्ट्रातही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव तसेच फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हयातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती दिनांक 14 एप्रिल 2020 अखेरपर्यंत पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
 या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून दिनांक 30 एप्रिल 2020 च्या मुदतीपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे.  त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पुढील आदेशापर्यंत मद्यविक्रीसाठी संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
 या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत   असलेल्या नियमानुसार योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.