वाढवणा पाटी येथे लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना समर्थ ची मदत
उदगीर : कोरोना च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे गेल्या महिन्यापासून तालुक्यातील वाढवणा पाटी येथे अडकून पडलेल्या परराज्यातील पंचवीस ते तीस कुटूंबाना लॉकडाऊन च्या दुस-या टप्प्यात एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट शुक्रवारी देण्यात आले.
कोरोना या विषाणू जन्य रोगाने संपुर्ण जगाला घेरले आहे. त्या अनुषंगाने शासनाने लॉकडाऊन चा कालावधी आणखीनच वाढवला. या दरम्यान वाढवणा पोलिस स्टेशन चे सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी प्रारंभी च्या काळात मदत केली होती. ही शिदोरी संपण्याआधीच एकुर्का रोड येथील समर्थ चे प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी मदतीचा हात पुढे करुन शुक्रवारी सकाळी स्वत: पालावर जाऊन या भटक्या कुटूंबना जीवनावश्यक वस्तूचे किट देत मायेचा आधार दिला. यावेळी संस्था सदस्य एम. व्ही. स्वामी, प्रणयन चौधरी, उस्मान पठाण, संजय जाधव, संदीप जाधव आदींची उपस्थिती होती.