माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सेफ्टी किटचे वाटप
उदगीर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरा परिवार व तालुका कॉंग्रेसच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हेर येथे पी. पी. ई किट चे वाटप करण्यात आले यामध्ये सेफ्टी किट तसेच मास्क, सॅनिटाझर, गोल्ज, इत्यादी साहित्य तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय पवार यांच्या उपस्थितीत हेर ,देवर्जन,नळगीर, वाढवणा बु, हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, अॅड. पद्माकर उगीले, माजी उपसभापती सोपानराव ढगे, नाना ढगे, संतोष रोडगे, अभिजित साकोळकर, रमेश माने, परमेश्वर खटके,धोत्रे,येलमटे,कडोळे,शेख,ईत्यादी उपस्थित होते.