सामान्य रुग्णालय, उदगीरच्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर

सामान्य रुग्णालय, उदगीरच्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर






 

 उदगीर : कोवीड-19 (कोरोना विषाणू संसर्ग) या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालय, उदगीर येथे संपूर्णतः डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल निर्माण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग,लातूर यांच्या सुचनेप्रमाणे सामान्य रुग्णालय उदगीर येथील सर्व दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,श्रीकृष्ण मंदीरासमोर, देगलुर रोड,उदगीर,जि.लातूर येथे करण्यात आले आहे. 

   यावेळी जनतेस कळविण्यात येते की पुढील आदेशापर्यंत उदगीर व परिसरातील सर्व नागरिकांच्या विविध आजाराची व आरोग्य विषयक समस्यांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार-शस्रक्रिया, गरोदर स्त्रियांची प्रसंगी, प्रसुतीपश्चात उपचार - मार्गदर्शन, अपघातामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार व तसेच रक्त, व लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे ई.सी.जी. तपासणी धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर येथे होणार आहेत. 

   रुग्णांना त्वरीत सेवा व उपचार मिळावे या करीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा सामान्य रुग्णालय व धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून आणि पॅरामेडिकल, टेक्निशियन अन्य सहायकांच्या सहकार्याने रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व तसेच यासंबंधी काही माहिती अपेक्षित असल्यास सामान्य रुग्णालय किंवा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय व्ही.पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.शशिकांत एस.देशपांडे व तसेच धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डाॅ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी केले आहे.




 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image