मुलीच्या वाढदिवसाची रक्कम रोटी कपडा बँकेस दान
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल आलापूरे यांनी त्यांची मुलगी 'कायरा' हिचा दुसरा वाढदिवस साजरा न करता उदगीर नगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात शेख गौस यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सेवा यज्ञात म्हणजेच 'रोटी-कपडा बँकेस' ५००० रकमेचा धनादेश दिला आहे. रोटी- कपडा बँकेच्या वतीने आजपर्यंत १७०० जणांची भोजनाची व्यवस्था तसेच मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप मोफत करण्यात आले आहे. प्रा. डॉ. राहुल आलापूरे यांनी समाजसेवेचा नवीन पायंडा घातल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.