उदगीरच्या "काRवा" फाउंडेशनचा "नातं माणुसकीचं" एक अनोखा उपक्रम
उदगीर : येथील कारवा फाउंडेशनद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात सध्या करोणा प्रादुर्भावाचाच्या पार्श्वभूमीवर कारवा फाउंडेशन कडून माणुसकीचा नातं हा अनोखा उपक्रम राबवत आहे.या उपक्रमांतर्गत गरजूंना दररोज जेवणासाठी लागणारे साहित्याची किट तयार करून गरजूंची गरज लक्षात घेऊन विविध भागात या किट चा वाटप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उदगीर येथील श्रीनगर कॉलनी, हनुमान नगर येथे काही गरीब लोकजे धुणीभांडी काम करून आपला उदरनिर्वाह करतात पण या करोनामुळे त्यांनाही काम करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांना जेवणाची सोय होत नसल्याने त्यांना या किटचे वाटप करण्यात आले. या किटची घरपोच सेवा कारवा फाऊंडेशनच्या वतीने आदिती पाटील यांनी केले, तर कारवा फाऊंडेशनचे सदस्य मुरलीधरराव जाधव, प्राचार्य व्ही.एस. कणसे, प्रा. बाबुराव जीवने यांच्या हस्ते सौ. सुलोचना तेलंगे व संगीता पवार यांना घरपोच वाटप करण्यात आले.