सामाजिक उपक्रम राबवित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सामाजिक उपक्रम राबवित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


    उदगीर : लॉक डाऊन मध्येही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली. येथील  विद्यार्थी जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले यात रक्तदान शिबिर अन्नदान वाटप व निबंध स्पर्धा या उपक्रमातून जयंती साजरी करीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उत्साहात जयंती साजरी करण्यासाठी महोत्सव समितीचे प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांनी पुढाकार घेऊन हे उपक्रम राबवले.
            विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी जयंती महोत्सव समितीच्या वतीने लाॅक डावून च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवले सध्या लाॅक डाऊन असल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे १०० गरजू  कुटुंबांना विजय निटुरे विचार मंचच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. शिवाय रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे ती तूट भरून काढण्यासाठी विद्यार्थी जयंती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात
सुशीलकुमार शिंदे, संजय बिरादार,  अतुल घोडके, अमोल माने, नितीन गायकवाड, कपिल शिंदे, अतुल कांबळे, नरेश चांदे, राजकुमार माणसे, आकाश गायकवाड, परमेश्वर बन, आकाश माने, पंकज कांबळे, बाळू जोगदंड, आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाॅक डाऊन असल्यामुळे ऑनलाइन खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ व महात्मा फुले चे शेतकऱ्यांसाठी योगदान या दोन विषयावर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती प्रथम पारितोषिक 3 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये व तृतीय पारितोषिक एक हजार रुपये ठेवण्यात आले होते. अशी माहिती सुशील कुमार शिंदे यांनी दिली असून वरील सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image