मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या आवाहनाला प्रतिसाद ; राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून चार क्विंटल अन्नधान्याची मदत
उदगीर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे या काळात शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी शहरातील दानशूर लोकांना मदतीचे आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उदगीर नगर परिषदेला अन्नधान्याची मदत देण्यात आली.
मागच्या दोन महिन्यांपासून देशात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजाराची लागण वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मुळे ज्यांचं हातावर उदरनिर्वाह आहे अशा लोकांची उपासमार होऊ नये याकरिता उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी शहरातील दानशूर लोकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय चर्मकार महासंघ उदगीरच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन क्विंटल तांदूळ, दोन क्विंटल गहू, 100 हॅन्ड ग्लोज व 100 कापडी मास्क उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भरत राठोड यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच उदगीर शहर पोलीस स्टेशन,शिवाजी चौक,उमा चौक व उदगीर शहरातील विविध चौकात पोलिस प्रशासनातील सर्वच कर्मचार्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष मधुकर वाघमारे, लातूर महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा सौ ललिता झिल्ले, संघटनेचे सल्लागार शिवाजी गायकवाड, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष प्रा. सुधीर नाबदे, शिक्षक तालुका उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, शिक्षक जिल्हा उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, तालुका सचिव गोपाळ सूर्यवंशी, संघटनेचे उदगीर शहराध्यक्ष सुनील गायकवाड, शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत कल्याणकर, शहर सचिव तानाजी लोहकरे, युवक जिल्हा सचिव माधव वाघमारे, युवक ता.उपाध्यक्ष धनंजय लोहकरे, युवक शहराध्यक्ष सुनील दामेवाले, इंजि.आकाश झिल्ले, राजेंद्र गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.