शहरातील डॉक्टरांना व पोलिस अधिका-यांना जयवंत पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने N95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप
उदगीर : कोविड 19 मध्ये सेवा करणाऱ्या उदगीर शहरातील डॉक्टरांना व पोलिस अधिका-यांना मास्क व गुलाबाचे फुलं देऊन युवा उद्योजक ट्रस्टचे संचालक बिपीन पाटील यांनी गौरव केला.
कोरोना विषाणू ने सर्वत्र धुमाकूळ घातला असुन याकरिता विविध प्रकारच्या उपाययोजना प्रशासन करत आहे. तसेच उदगीर तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात अग्रेसर असलेले व समाज कार्यसाठी अविरत झटणारे जयवंत पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उदगीर शहरातील सर्व दवाखान्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनावर नियंत्रण करणाऱ्या उपचारादरम्यान युद्ध पातळीवर आपले जीव धोक्यात घालून सेवा देत असलेले डॉक्टर आणि पोलिस त्यांचे सहकारी याचे मनोबल वाढविण्यासाठी उदगीर शहरातील प्रत्येक दवाखान्यात जाऊन तेथील डॉक्टर मंडळी व कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल व N95 मास्क देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.
देशात आणि राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशभर लाॅकडाऊन घोषित केले आहे. उदगीर शहरातील उद्योगपती जयवंत पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील उपजिल्हारुग्णालय व उदयगिरी मल्टीस्पेशालिटी, डॉ. माधव चंबुले. डॉ संजय पवार. डॉ. दत्तात्र्य पवार, डॉ. प्रविण मुंदडा.डॉ शादीक पटेल, डॉ. आत्तार, डॉ. चव्हाण, डॉ. देशमुख, डॉ. रमण रेड्डी, डॉ.बाहेती, डॉ. बलशेटवार, डॉ. प्रशांत चोले, डॉ. दिपक जगताप, डॉ. योगीराज चिद्रे,डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. ईसा खान परभणीकर, डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. रामप्रसाद लखोटीया,डॉ. चामवाड, डॉ. भातबे्, डॉ. वायगांवकर, डॉ. बनशेळकीकर, डॉ.शरद तेलगाने, डॉ. अचवले यांच्या सह रस्त्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक गुलाबाचे फुल व N95 मास्क देऊन त्याचा गौरव केले. विविधभागात असलेल्या दवाखान्यात जाऊन N95 मास्क वाटप करण्यात आले. यावेळी शिवा गोरे,माधव रेड्डी उपस्थित होते.