महामानवाच्या पुतळ्यास विद्युत रोषनाई व फुलांची सजावट करावी....
माजी नगरसेवक गजानन सताळकर यांची न.प. कडे निवेदनावव्दारे मागणी
उदगीर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या १४ एप्रिल रोजी १२९ वी जयंती असुन त्यानिमित्त शहरातील डाॅ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास विद्युत रोषनाई व फुलांची सजावट करण्याची मागणी माजी नगरसेवक गजानन सताळकर यांची नगर परिषदेकडे एका निवेदनावव्दारे केली आहे.
विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरी होते मात्र या वर्षी कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन संपूर्ण देश लाॅकडाऊन असल्याने समाजबांधव यावर्षीची जयंती आपआपल्या घरीच साजरी करणार आहेत मात्र महामानवाच्या पुतळ्याची स्वच्छता करुन,विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्याची मागणी माजी नगरसेवक सताळकर यांनी नगर परिषदेकडे केली आहे पण त्याला नगर परिषद किती प्रतिसाद देते हे तर परवा महामानवाच्या जयंतीदिनीच कळणार आहे.
उदगीर शहर व तालुक्यात बौद्ध बांधवाची संख्या ही लक्षणीय असुन सर्व समाजबांधव हे यावर्षी राहत्या ठिकाणीच डाॅ.आंबेडकरांची साजरी करणार असले तरी सार्वजनिक स्वरूपात पुतळ्याची सजावट व्हावी ही सर्व बहुजन समाजाची ईच्छा असल्याने उदगीर नगर परिषदेने याकडे लक्ष देवून डाॅ.आंबेडकर पुतळ्याची रोषणाई करणे आवश्यक आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही नगर परिषदेच्या वतीने समाजमंदिरास रंगरंगोटी करण्यात येईल असे समाजबांधवास वाटले होते पण एकच दिवसावर जयंती आली आहे तरीही नगर परिषद काहीच करत नसल्याचे याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे माजी नगरसेवक गजानन सताळकर यांनी दै.देशोन्नतीशी बोलताना सांगितले.