मादलापुर येथे दिव्यांग बंधू-भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
उदगीर : कोरोना (कोव्हिड 19) या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यामुळे गरीब व अपंग असलेल्या लोकांना दोन वेळचे जेवण ही मिळणे अवघड झाले आहे म्हणून रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित, संवेदना प्रकल्पांतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर व समाज कल्याण, जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर तालुक्यातील मादलापुर येथील दिव्यांग बंधू-भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलजी केंद्रे, सौ ज्योतीताई राठोड (सभापती, महिला व बालकल्याण विभाग जि प लातूर) रोहिदासजी वाघमारे (सभापती, समाज कल्याण विभाग जि प लातूर) बापूराव राठोड ( भा ज पा जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल लातूर तसेच माजी कृषी सभापती जि प लातूर) विजयकुमार पाटील (सभापती प. स. उदगीर) जनकल्याण संघाचे दिलीप कुलकर्णी, अंगद केंद्रे (ग्रामसेवक )शिंदे (सरपंच) विलास शिंदे व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले