दिवस रात्र मी तुमच्या सेवेसाठीच : राज्यमंत्री संजय बनसोडे

दिवस रात्र मी तुमच्या सेवेसाठीच : राज्यमंत्री संजय बनसोडे


डाॅक्टरांना सर्व सुविधांचा पुरवठा करु 



   उदगीर : देशभरात कोरोना सारख्या महामारीच्या रोगाने थैमान घातले असुन या पार्श्वभूमीवर उदगीर मतदार संघातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही आजपर्यंत अनेक बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजनेची अंमलबजावणी केली आहे. शहरातील काही खाजगी रूग्णालये बंद काही दिवस बंद असल्याचे कळल्याने मी आपल्या अडीअडचणी समजून घ्यायला ही बैठक आयोजीत केली असुन मतदार संघातील नागरिकांची गैरसोय होवु देवु नका, दिवस रात्र मी तुमच्या सेवेसाठीच आहे मतदार संघात फिरत असुन आपण घाबरुन न जाता जनतेला व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात खाजगी डाॅक्टरांच्या बैठकीत बोलत होते.


पुढे बोलताना राज्यमंत्री बनसोडे यांनी
देशात सर्व ठिकाणी लाॅकडाऊनची परिस्थिती असताना शासनाच्या नियमानुसार सर्व जिवनाश्यक वस्तूंच्या दुकानासाठी व भाजीपाल्यासाठी ठराविक वेळ दिली आहे मात्र या संकटाच्या काळात डाॅक्टरच देवदूत बनून रूग्णांची सेवा करुन त्याच्या आरोग्याची काळजी घेतो पण शहरातील काही खाजगी रूग्णालये बंद असुन आमची गैरसोय होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी माझ्याकडे भ्रमणध्वनीव्दारे केली असल्याने मी आपल्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी घेवुन आलो आहे असे बनसोडे यांनी सांगितले. सद्या आपण जवळ - जवळ कोरोनाच्या तिसऱ्या टप्यात आलो असुन याबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असुन सर्व डाॅक्टर मंडळींनी योग्य ते काळजी घेवुन सहकार्य करावे, आप - आपली रूग्णालये स्वच्छ ठेवावीत. जेणेकरून आपण कोरोना संबंधित आजारापासुन दुर राहू.


यावेळी खाजगी डाॅक्टरांना कोरोना संबंधीचे सेफ्टी किट देण्यात यावी अशी मागणी केली असता ना.बनसोडे यांनी ती शासनाकडुन उपलब्ध करु देवु पण उपलब्ध नाही झाल्यास मी स्वतः स्वखर्चाने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. 


यावेळी वैद्यकीय उपसंचालक डाॅ. एकनाथ
माले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.गंगाधर परगे,
यांनी उपस्थित खाजगी डाॅक्टरांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजी आ.भालेराव, बसवराज पाटील नागराळकर, डाॅ.लखोटिया, ढगे , दत्ता पाटील, आदींनी मार्गदर्शन केले.


याप्रसंगी माजी आ.सुधाकर भालेराव, रा.काँ. चे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटराव बेद्रे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, मुख्याधिकारी भारत राठोड, डाॅ.माधव चंबुले, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, डाॅ.रामप्रसाद लखोटिया, डाॅ.दत्ता पाटील, परगे, ढगे आदी उपस्थित होते.


या बैठकीचे सुत्रसंचलन डाॅ.माधव चंबुले यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक
डाॅ.पवार यांनी मानले. या बैठकीस डाॅ.शशिकांत देशपांडे, डाॅ.जगदीश येरोळकर, डाॅ.गोविंद सोनकांबळे, डाॅ.दिपक सोमवंशी, डाॅ.प्रशांत चोले, डाॅ.चंदावार, डाॅ.नंदकिशोर पांचाळ, डाॅ. प्रवीण मुंदडा, डाॅ.ओमप्रकाश कल्याणी, डाॅ.चिद्रे, डाॅ.केंद्रे,यांच्यासह शहरातील सर्व खाजगी डाॅक्टर उपस्थित होते.


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::


स्तुत्य उपक्रम...


नगर परिषदेच्या वतीने 
सामान्य रूग्णालयासमोर उभारण्यात आलेल्या सानिटायझरयुक्त हॅन्डवाॅशचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना न.प.चे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी शहरात सध्या पाच ठिकाणी हॅन्डवाॅस स्टेशन बसविले असुन आणखी काही वेगवेगळ्या भागात आम्ही करणार आहोत त्याचबरोबर शहरात सगळीकडे निरजंतुकीकरण करण्याचे काम फवारणी करुन चालु असुन नागरिकांना घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकारी राठोड यांनी केले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image