उदगीरच्या भुमीपुत्राचे कौतुकास्पद कार्य.... पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडेचे सर्वत्र कौतुक...

उदगीरच्या भुमीपुत्राचे कौतुकास्पद कार्य....
पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडेचे सर्वत्र कौतुक...



   मुंबई : कोरोनामुळे राज्यासह संपुर्ण देशाची परिस्थिति बिकट झाली आहे.
संचारबंदी सुरु असल्याने मजूरी बंद आहे. अशावेळी गरीब व मजूर लोकांची परिस्थिति खुप दयनीय आहे. यात मुंबईच्या एका महिलेने दोन दिवसांपासुन जेवायला नाही म्हणून पुलावरुन उड़ी घेत आत्महत्येचा प्रयत्न करत असताना मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचा प्राण वाचला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
उदगीर जि. लातूर येथील भुमीपुत्र श्रीकांत शिवाजी देशपांडे पो.शि. 093566 मालाड पोलीस ठाणे असून राहणार MRA पोलीस लाईन रूम नं 08 /A विंग, नियर कॉफोर्ड मार्केट या ठिकाणी राहायला असून दि.३ एप्रिल रोजी रात्री 7 :05 मी ला मालाड पोलीस ठाणे रात्रपाळी कर्तव्य करिता जात असताना एक महिला जे जे ब्रिज वर चढुन ब्रिज वरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे असे निर्देशनास आल्याने देशपांडे यांनी त्यांची मोटारसायकल तात्काळ थांबवली आणि त्या महिलेकडे धाव घेतली. ती महिला आत्महत्या करण्यसाठी तिने तिचा एक पाय ब्रिज वरून खाली सोडत होती. हे पाहुन देशपांडे ही मनापासून घाबरलो होते व त्यांचे पाय थरथर कापत होते. क्षणाचाही विलंब न करता धावत धावत जाऊन तिला पकडून तिचा उजवा हात पकडला नि माघे ओढून ताणून घेतलो असे सांगून देशपांडे यांनी घडलेला प्रकार आमच्याशी बोलताना सांगितला,  तेव्हा ती माझ्या हाताला झिडकारा देत होती व म्हणत होती मला मरू द्या, मी दोन दिवस पासून जेवण केले नाही. मला या जगणायचा खुप कंटाळा आला आहे. मला नका वाचवू असे बोलत ती खुप रडत होती. ती परत परत मला मरू द्या असे मनत असल्याने तिला धरून ठेवलो आणि मी तात्काळ 100 नं फोन करून मला पोलीस मदत हवी आहे. लवकर पोलीस पाठवा असे सांगितले असता MRA पोलीस तात्काळ सदर ठिकाणी आली असता ती पोलीस गाडी पाहुन माझा हाताला झिडकारा देऊन जाण्याचा प्रयत्न करत होती पण मी त्या महिलेस पकडून धरलो आणि पोलीसांच्या ताब्यात दिल आणि पोलीस आणि मी तिला प्रेमाने विचारलो तू आत्महत्या करू नको तेव्हा ती महिला सारखी रडत होती मी व पोलीस तिची समजूत काढत होतो पण ती खूप मानसिक रित्या गोंधळलेली होती MRA पोलीसांच्या ताब्यात देऊन मी रात्र पाळी करिता निघलो पण मन स्तब्ध झाले होते की,  जेवणासाठी एक महिला जीवनाला कंटाळून जीव देतीय ही गोष्ट खूप  मनाला भुरळ घातली आहे . पण मी त्या महिलेला आत्महत्या करीत असताना पाहून मी खूप घाबरलो होतो पण विचार केला आज हिला काही झाले तरी मरू देण्याचे नाही आणि या ध्यासाने तिला पकडण्यासाठी धाडसाने तिच्याकडे धाव घेत तिला वाचवले मनाला खूप बरे वाटले. मी पोलीस खात्यात नौकरी करत असल्यापासून आज खरे समाजासाठी काहीतरी केले असल्याचे समाधान मला वाटले असे पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे यांनी जनस्तंभ न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले आहे.
उदगीरच्या भुमीपुत्राने आपले कर्तव्य बजावत असताना केलेल्या कार्याबद्दल श्रीकांत देशपांडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून खाकी वर्दीतील खरा दर्दी माणूस म्हणून आज त्यांची ओळख होत आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image