खा.सुधाकर श्रृंगारे यांनी दिली व्हिडिओ कॅन्फरिंगव्दारे केंद्र सरकारला माहिती...

खा.सुधाकर श्रृंगारे यांनी दिली व्हिडिओ कॅन्फरिंगव्दारे केंद्र सरकारला माहिती...


   चाकुर : लातूर जिल्ह्याच्या कोरोनाग्रस्तांचा आढावा घेवुन त्या संदर्भातील संपूर्ण माहिती 
खा.सुधाकर श्रृंगारे यांनी व्हिडिओ कॅन्फरिंगव्दारे केंद्र सरकारला माहिती दिली.


   संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन आजपर्यंत लातूर जिल्ह्यात एकही कोरोना ग्रस्त एकही रुग्न नाही, याबाबत लातूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रना जबाबदारीने काम करत असुन याबाबत जिल्ह्यातील खबरदारीचा आढावा खा.श्रृंगारे यांनी दिली.


   यावेळी लाइव्ह व्हिडीओ कॅन्फरिंगव्दारे खा.रावसाहेब दानवे, खा.प्रितम मुंडे, खा. सुजय विखेपाटील, यांच्यासह लातूर जिल्ह्याचे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी ही आप आपल्या जिल्ह्यातील माहीती दिली.


   यावेळी भविष्यात जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य रोगाने ग्रासले तर त्यांना शहरातील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलला आवश्यक त्या सुविधा देवून, २४२ खाटांचे सर्व सुविधायुक्त हाॅस्पिटल तयार असुन, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ५० हजार गरजू व कष्टकरी नागरिकांना जेवणाची व्यवस्था स्वतः करत असून तालुक्यातील पदाधिकारी याकामासाठी परिश्रम घेत आहेत.


   यावेळी लातूर जिल्ह्यातील पोलीस व वैद्यकीय यंत्रणा याकामी सहकार्य करत असुन अनेक सामाजिक संस्थाही काम करत आहेत. आज पर्यंत लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही याबाबत समाधान व्यक्त केले असुन सर्व प्रशासकीय अधिका-यांचे कौतुक केले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image