पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप



   उदगीर : कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून चोवीस तास सेवा देणा-या पोलिस कर्मचारी यांना एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी बुधवारी दुपारी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली.  
उदगीर शहरात उमा चौक येथे कर्तव्यावर असलेल्या व वाढवणा पाटी, पोलिस स्टेशन येथे जाऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.  सोबतच कोरोना या विषाणू जन्य आजाराबद्दल जाणीव जागृती करणारे पत्रक ही वाटप करण्यात आले. यावेळी वाढवणा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रा. एम. व्ही. स्वामी, रसूल पठाण, संजय जाधव यांची उपस्थिती होती. सामाजिक अंतर राखत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणा-या या पोलिस कर्मींना वंदन करत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image