"आध्यात्मिक साधना" म्हणजेच कोरोना या आजारापासून होणारा "विजय"

"आध्यात्मिक साधना " म्हणजेच कोरोना या आजारापासून होणारा "विजय"



   उदगीर : "कोरोना" संसर्ग हा आपल्या हिंदुस्थानावर आलेलं संकट दूर करण्यासाठी व आपल्या राज्यातील व गावातील प्रत्येक व्यक्तीचे मानसिक, शारीरिक व बौद्धिक शक्ती वाढावे व हिंदुस्थानावर आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावे, या हेतूने पुरोहित विजय कुलकर्णी महाराज यांनी व्हाट्सअप्प द्वारे ऑनलाइन सामूहिक "महामृत्युंजय मंत्राचा" सव्वा लाख जप पूर्ण करण्याचा संकल्प केला.


शास्त्रानुसार महामृत्युंजय मंत्र हा सर्व महामारी/रोगावर रामबाण उपाय आहे.
"आध्यात्मिक साधना" या नावाने सुरू केलेले हे व्हाट्सअप्प ग्रुप या ग्रुप मध्ये 30 सदस्याने आपल्या आपल्या घरी बसून जप करायला सुरुवात केली आहे, आज 10 दिवसात ८५८६१ जप संख्या पूर्ण केलेली असून पुढील 4 दिवसात हा सव्वा लाख जप पूर्ण होत आहे. पुढील काळात हिंदुस्थानात आलेले हे संकट दूर होणार नाही तो पर्यंत आम्ही आध्यात्मिक साधना करत राहणार असे पुरोहित विजय कुलकर्णी महाराज यांनी सांगितले आहे.
    या ग्रुप मध्ये बालाजी डोईजोडे, आश्विनी जोशी, प्रमोद शेटकार, प्रमोद पटवारी, नितीन ढगे, संजय कामशेटे, प्रशांत बी शेटे, शैला लोखंडे, संगीता बिरादार यांसह आदी जण या ग्रुप मध्ये सहभागी असून पुढील काळात गणपती अथर्व शीर्ष व रामरक्षा स्रोत, दुर्गासप्तशती यासह अनेक मंत्राचा व स्रोताचा स्वगृही सामूहिक साधना केली जाणार आहे असे पुरोहित विजय कुलकर्णी महाराज यांनी सांगितले असून हिंदुस्थानात जो पर्यंत कोरोनाचे संकट असेल तोपर्यंत ही साधना सुरू असेल असे मत व्यक्त केले आहेत.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image