बसव जयंती घरातच साजरी करावी

बसव जयंती घरातच साजरी करावी



   उदगीर : लिंगायत धर्मांचे  संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१५ वी जयंती रविवार  दि.२६ एप्रिल २०२० रोजी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उदगीर शहरात मोठ्या थाटामाटात व आंनदात प्रतिवर्षी जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने कोणतेही सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होणार नसून रविवारी बसवभक्तांनी ही जयंती घरातच पुजा, प्रार्थना, पाळणा व वचन साहित्यांचे वाचन करून साजरी करावी असे आवाहन म. बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांनी केले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image