उदगीर येथील कोरोना पॉझिटिव 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

उदगीर येथील कोरोना पॉझिटिव 70 वर्षीय महिलेचा मृत्यू


लातूर :  उदगीर उपजिल्हा रुग्णालयात दि. 23 एप्रिल 2020 रोजी अत्यावश्यक अवस्थेत एक 70 वर्षीय महिला रुग्ण दाखल झालेली होती. या दाखल झालेल्या 70 वर्षीय महिलेचा कोरोना स्वाब रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव आलेला होता. तसेच या महिला रुग्णास मधुमेह व रक्तदाब आजार होते व त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी या कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे. 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image