अनिल मुदाळे यांच्या वतीने गरीब गरजु कुटुंबांना 60 क्विंटल राशन घरपोच
उदगीर : देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाने अनेकांचा मृत्यू होत असुन या महामारीमुळे संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. त्यातच कष्टकरी व मजुरांवर कामे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या १७ दिवसापासून सर्व कामधंदे बंद असल्याने उदगीर शहरातील गोरगरिबावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व कष्टकरी व दिनदुबळ्या लोकांच्या मदतीला येथील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अनिल मुदाळे धावुन येवुन भटक्या समाजातील व त्यांच्या प्रभागातील एकूण 545 गरीब कुटूंबाना तांदुळ, गहु, तेल, दाळ, साखर, पत्ती, बिस्कीट चे किट बनवुन जवळपास ६० क्विंटल राशन घरपोच दिले.
माजी नगरसेवक अनिल मुदाळे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. मनकर्णा मुदाळे हे नेहमीच अनेक सामाजिक कार्यातुन गोरगरीबांची मदत करतात. कुठलाही वारसा नसताना केवळ सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवत सर्व जाती धर्माला सोबत घेवुन एका सर्वसामान्य व कष्टकरी कुटुंबातील अनिल मुदाळे यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी किट बनवुन घरपोच देण्यासाठी सोनु जलसे, बाबुराव मुदाळे, विनोद कासले, नागनाथ चौधरी, हणमंत यात्रे, शिवराज जलसे, तुळशीराम यात्रे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.