कपाळे गल्लीतील युवकांनी केले  500 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

कपाळे गल्लीतील युवकांनी केले  500 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप



      उदगीर : येथील कपाळे गल्लीतील युवकांनी  लॉकडाऊनच्या काळामध्ये गरीब व गरजू लोकांना वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, श्री क्षेत्र महादेव मंदिरचे अध्यक्ष  श्रीकांत पाटील यांच्या उपस्थीतीत  गहू, तांदुळ तसेच मास्क व हॅन्ड वॉशचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून  माणुसकीचे दर्शन घडविले आणि अन्न दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हे लोकांना दाखवून दिले. कपाळे  गल्ली, फुलारी गल्ली, भोई गल्ली, महाजन गल्ली,  कोळी गल्ली व परिसरातील गोरगरीब जनतेची गरज लक्षात घेऊन या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले.


या वाटपामध्ये प्रामुख्याने नॅशनल युनिटी अवॉर्ड  व महाराष्ट्र राज्य मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले, श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक,  दानशूर व्यक्तिमत्व  प्रा.प्रदीप वीरकपाळे, अरुण फुलारी, राजकुमार कपाळे, विश्वनाथ पाटील, संजय आडे, आकाश बिरादार, सुनील बाळे, अमर चिंचोळे, प्रमोद कामण्णा, जनार्धन फुलारी, महादेव पसारे, अमित पसारे,   शेखर फुलारी, भागवत चौधरी, संगम कामण्णा, शिवा आडे,  अविनाश खरात, शैलेश आडे, राहुल फुलारी, संतोष कवठळे, नागेश फुलारी, प्रशांत रंगवाळ, गिरीश स्वामी,  संतोष हाळे,  महादेव कपाळे, सचिन कारमुंगे, अजय कबाडे, अजय पाटील, सुनील फुलारी, साई लदाडे, शशिकांत फुलारी इत्यादी सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या नियमांचे पालन करून  घरोघरी जाऊन या अन्नधान्याचे वाटप केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image