आपत्ती व्यवस्थापन समितील लॉयन्स क्लब व लॉयन्स नेत्र रुग्णालय ची मदत
उदगीर : सध्या संपूर्ण देशात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात लोक डाऊन करण्यासोबत संचारबंदी लागू असलेले आहे. त्यामुळे हातावर काम करून खाणारे गरीब मजूर अन्नधान्य नाही म्हणून उपाशी राहू नये यासाठी उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तू चे तिकीट स्वरूपात मदत करण्याचे आव्हान सामाजिक सेवाभावी संस्था दानशूरांना करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्या उदगीर शहराचे नाव गेल्या 14 वर्षापासून सातासमुद्रापार घेऊन गेले ले उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाने उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापनच्या आवाहनाला प्रतिसाद देत. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे गहू तांदूळ तुरडाळ इ.साहित्याचे 51 कीट उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला सुपूर्त केले. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मंडळाधिकारी शंकर जाधव, उदगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष तथा माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामप्रसाद लखोटिया, महेश बसपुरे, प्रदीप बेद्रे, प्रवीण मुंदडा, ईश्वरप्रसाद बाहेती, सुरेश देबडवार, रमेश मुक्कावार, बालाजी आदेपा, दिपक जोशी, भास्कर मंगल्कर इ.लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह कर्मचारी सुरेश तिवाडी, वैजनाथ नारंगवाडे, रवी जावळे आदी उपस्थित होते.