लातूरातील परप्रातीय ८  रुग्णापैकी ७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

लातूरातील परप्रातीय ८  रुग्णापैकी ७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह



लातूरातील परप्रातीय ८ रुग्णापैकी ७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख




लातूर  :  लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्था येथे उपचार घेत असलेलया आध्रप्रदेशातील कोवीड – १९ बांधीत ८ रुग्णापैकी ७ जणाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. लातूरकरांच्यादृष्टीनेही ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यातील उपचार नियमानुसार २४ किंवा ४८ तासानंतर त्या रूग्णाची आणखी एक टेस्ट घेण्यात येईल ती निगेटिव्ह आल्यास त्यांना त्यांच्या आध्रप्रदेशातील कर्नुल जिल्हयात त्यांच्यावर नंदयाल या मुळ गावी पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख दिली आहे.या संदर्भाने बोलतांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगतिले की, अदयाप पर्यंत लातूर जिल्हयात स्थानिकचा एकही कोवीड – 19 पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. उत्तरेकडील हरियाणा राज्यातुन आध्रप्रदेशातील कर्नुल जिल्हयात जात असतांना बारा जणंना अडविण्यात आले व त्यांची तपासणी केली असता त्यापैकी ८ जण कोवीड – १९ पाझीटीव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेत १४ दिवस उपचार करण्यात आले आहेत. यशस्वी उपचारानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यात आल्यास परराज्यातील रुग्णामुळे तांत्रीकदृष्टया जो लातूर जिल्हया कोवीड – १९ बाधीत दाखविला जात होता तो अधिकृतरीत्या कोवीड – १९ मुक्त होईल.



 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image