माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था 


युवक काँग्रेसचा उपक्रम : १००० गरजुंनी घेतला लाभ



   उदगीर : माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर तालुक्यात गरजू व गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप व भोजनाची व्यवस्था लातूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते जवळपास 1000 गरजू व्यक्तींना अन्य धान्य वाटप करण्यात आले व त्याच बरोबर चारशे नागरिकांना भोजन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटूरे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिद्धेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, बाजार समितीचे संचालक सुभाष धनुरे, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष. तथा नगरसेवक विजय निटूरे, उदगीर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगीरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस नागेश पटवारी, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष शशिकांत बनसोडे, बाबुराव समगे , येणकीचे सरपंच न्यानेश्वर बिरादार, यांच्यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.