जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करणार : जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर : तालुक्यातील उमरगा मन्ना येथील गावकऱ्यामार्फत आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी वरील उद्गगार काढले.
लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उदगीर तालुक्यात पहिल्यांदाच बहुमान मिळाल्याबद्दल नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन मन्ना उमरगा येथे करण्यात आले होते.
या नागरी सत्कार समारंभ मध्ये उत्तर देत असताना राहुल केंद्रे म्हणाले की शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जोडधंदे जोडधंदे चालू करायला पाहिजेत
शेणखतापासून कागद निर्मितीसाठी राजस्थानचा अभ्यास दौरा करण्यात येणार आहे, विविध नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत तसेच नवीन जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची टीम चांगली असुन त्यांच्या समन्वयातून विकास साधणार.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष केसगीरे, तानाजी मोरे, विनोद हल्लाळे, आनंद बिरादार, सतीश महाराज गिरी,राम मोरे, हनुमंत बिरादर, शिवाजी देवकते, रवी मोरे , रामकिसन कवडेकर, कैलास कवडेकर ,सुधीर कांबळे, अण्णाराव कांबळे, नागोराव केसगीरे, अंबादास चौधरी ,प्रकाश मोरे, ज्ञानेश्वर मोरे, आदींनी परिश्रम घेतले.