उदयागिरीत प्रा. डॉ. संतोष मुळे यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संतोष मुळे यांचे केंद्रीय अर्थसंकल्प 2020 -21 या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के(व.म.), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव (क.म.)हे उपस्थित होते.
डॉ. मुळे म्हणाले, केवळ जमा-खर्चाची नोंद म्हणजे अर्थसंकल्प नाही. समाजाचा महत्तम हित साध्य करण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांमध्ये अर्थसंकल्पाविषयी अत्यंत गुप्तता पाळली जाते. अर्थसंकल्पाविषयी सामान्य माणसांपेक्षा व्यापार जगतात काम करणाऱ्या लोकांमध्ये अधिक उत्सुकता असते. मुळातच भारतात साक्षरता कमी आहे, त्याहूनही अधिक अर्थ साक्षरता कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. संजीव सूर्यवंशी यांनी केले.