सागर के किनारे हि मानवतावादी विचारांचा किनारा दाखवणारी साहित्यकृती - सुरेश गीर
उदगीर : आपला देश विभिन्न वेशभूषा, अनेक भाषा,सांप्रदाय, संस्कृतीनीं युक्त असल्यामुळे येथे विविधतेत एकता दिसुन येते. या सर्व विषयाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जोडणारे गीत आणि गजलांचा समावेश असल्यामुळे सागर के किनारे हि मानवतावादी विचारांचा किनारा दाखवणारी साहित्यकृती ठरते असे मत प्रसिद्ध गजलकार सुरेश गीर (सागर लातुरी) यांनी व्यक्त केले.
बालाजी बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या चला कवितेच्या बनात अंतर्गत च्या २१३ व्या वाचक संवादात लातूरचे प्रसिद्ध गजलकार सुरेश गीर ऊर्फ सागर लातूरी यांनी स्वलिखित सागर के किनारे या साहित्यकृतीवर संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, स्त्रियांच्या गुण वैशिष्ट्यासह राजनीती, स्वातंत्र्य , विनोद , सामाजिकता , विज्ञान -तंत्रज्ञान , मानवता आणि प्रेम अशा विभिन्न २१ विषयावरील गजला या संग्रहात असुन या संग्रहास हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक डाॕ सूर्यनारायण रणसुभे यांची प्रस्तावना लाभलेली आहे.हे सांगतानच अनेक गजलांचे विश्लेषण करत त्या गावून ही दाखवल्या.
यानंतर संपन्न झालेल्या चर्चेमध्ये प्रसिद्ध गजलकार हावगीराव बापूरे, मुरलीधरराव जाधव, कु.सुप्रिया वजनम आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. यानंतर बालाजी बिरादार यांनी मार्मिक व समर्पक अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे संचालन कु. प्रतीक्षा बिरादार हिने केले प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रतिभा मुळे यांनी करून दिला तर आभार कु.प्रतिक्षा लोहकरे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा.राजपाल पाटील, निवृती रायवाड, गोविंद भूरे, जाधव मुरलीधर, हणमंत म्हेत्रे, राजकुमार तोंडचिरकर व संयोजक अनंत कदम आदिंनी परिश्रम घेतले.