प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे - राज्यमंत्री संजय बनसोडे

 


 


कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे - राज्यमंत्री संजय बनसोडे



संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडून टाळ्या वाजून अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार


   लातूर : आज देशभरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. यास देशात, राज्यात तसेच लातूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ब्रेक दि चेन यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यासोबतच जे डॉक्टर, पोलीस, नर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी या कोरोना विषाणू विरोधात दिवस रात्र लढत आहेत व  लोकांची सेवा करीत आहेत. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाच वाजता सर्वत्र घंटा नाद व हाताने टाळया वाजवण्यात आल्या. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही आपल्या कुटुंबीयांसमवेत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता म्हणून हाताने टाळ्या वाजवून आभार मानले.


  कोरोना या विषाणूजन्य आजारा विरोधात संपूर्ण देशात व  राज्यात आपण लढत आहोत . प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था दिवस - रात्र या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री हि परिस्थिती काळजी पुर्वक हाताळत आहेत. या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहेत. लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणीही घाबरून जाऊ नये. प्रशासनाने सांगितलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image