प्राचार्य व्ही.एस. कणसे यांची राष्ट्रीयरत्न पुरस्कारासाठी निवड
उदगीर : येथील विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य व्यंकटराव शामराव कणसे यांना त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांची नागपूर येथील कलाजीवन मल्टीपर्पस सोसायटी द्वारा दिला जाणारा सन 2020 च्या राष्ट्रीयरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांना दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवेंद्र लॉन, मानेवाडा रोड चौक, अध्यापक महल्ले सभागृह, नागपुर येथे सायं. 5 वाजता, आंतरराष्ट्रीय 2019 मिस इंडिया पुरस्कार प्राप्त महिला रुचिका घोडमारे व राष्ट्रीय मिस इंडिया पुरस्कार प्राप्त 2017 सौम्या मंगलानी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी पद्मश्री डॉ.विकास महात्मा मध्य प्रदेश, डॉ.लाल बहादुर राणा गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्राचार्य कणसे यांना आज पर्यंत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा विविध संस्था, शासकीय निमशासकीय, शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या निवडीबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर, सचिव ज्ञानदेव झोडगे, मुख्याध्यापक एस.एन. घोडके, उपमुख्याध्यापक अविनाश पोशेट्टी, पर्यवेक्षक ही.एम. बांगे, एस.पी. धुमाळे, पी.जी. काळे आदींनी अभिनंदन केले असून त्यांचे मित्र परिवारातून व सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.