अटल टिंकरिंग लॅब विज्ञानाचा खजिना - नितीन शेटे
लाल बहादुर विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबच उद्घाटन
उदगीर : अटल टिंकरींग लँब ही विद्यार्थांसाठी ज्ञानाचा खजिना ठरणार आहे.असे प्रतिपादन नितीन शेटे यांनी केले. विद्यार्थांना संबोधित करतांना ते म्हणाले, ही लॅब गुगलच्या प्रकियेतून चालणारी असून विद्यार्थांना विज्ञानविषयक पडणारे प्रश्न या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुटण्यास निश्चित मदत होईल.डोळसपणा हे विज्ञान असून बंद डोळ्याआड होणारे ज्ञान अध्यात्म असते. मानवी जीवनात दोन्ही गोष्टींना महत्व आहे.असे त्यानी विज्ञानाचं महत्व विषद केलं.
राष्ट्रिय विज्ञान दिनाचं औचित्य साधून लाल बहादूर शास्त्री विद्यालयात अटल टिंकरिंग लँबच उद्घाटन बाल वैज्ञानिक ,विद्यार्थी यश शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेंद्र आलुरकर,संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे व गटशिक्षणधिकारी भगवान फुलारी यांची विशेष उपस्थिती होती. भगवान फुलारी यांनी शाळेने राबविलेल्या नवोपक्रमाचं कौतुक करून. अशा प्रयोगशाळा उभ्या करणे ही काळाची गरज आहे.असे सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेद्र आलुरकर यांनी विज्ञान हे कोणत्याही गोष्टीचे कारणमिमांसा करुन सत्य गोष्टिचा उलगडा करते. विद्यार्थांना हे असे का?पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अटल टिंकरींग प्रयोगशाळेतून मिळण्यास निश्चित मदत होईल.असे संबोधित केले.
आशा मोरे यांच्या माध्यमातून माजी विद्यार्थांकडून शाळेला वीज साठा यंत्र भेट देण्यात आले.या प्रसंगी मधुकर वट्टमवार,शंकरराव लासोने,व्यंकटराव गुरमे,डॉ संजय कुलकर्णी षण्मुखानंद मठपती,मुख्याध्यापक संजय विभुते,देविदास राठोड,सांब शास्त्री,मिना शास्त्री,प्रदिप कुलकर्णी,लालासाहेब गुळभिले उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिता येलमटे,प्रास्ताविक माधव जोशी व आभार दिक्षीत यांनी मानले.