चंदन पाटील नागराळकरांनी दिला निराधारांना आधार....
उदगीर : देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण देशात संचारबंदी लागू असल्याने अनेक गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दररोज मोल मजुरी करुन आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी लागेल ते काम करणाऱ्यावर मोठे संकट आले होते. या निराधार नागरिकांना आधार देण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष युवा नेते चंदन पाटील नागराळकर यांनी केले आहे.
शहरातील विविध भागात राहणाऱ्या मजूर, कष्टकरी नागरीकांना एका आठवड्याचे संपूर्ण राशन यामध्ये सर्व जीवनाश्यक वस्तु असलेली एकुण १४ किलोची बॅग स्वखर्चातुन चंदन पाटील नागराळकर यांनी शहारातील ज्या भागात गोरगरिब व कष्टकरी नागरिक राहत असतात तेथे जावून स्वतः ती बॅग दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये गहु, तांदूळ, दाळ, चहा-पत्ती, पेस्ट, तेल, साखर यासह अनेक जीवनावश्यक वस्तु आहेत. त्यामुळे शहारातील काही भागातील नागरिकांचा पोट भरण्याचा प्रश्न सुटला असुन विविध टप्पे करुन जेथे गरज आहे अशा गरजुंना त्यांच्या घरापर्यंत जावून आम्ही जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणार असल्याचे चंदन पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी सुमेरु पाटील, अजय शेटकार, गौस शेख, असलम शेख, आदी उपस्थित होते.
दखल....
उदगीरमधील नागरीकांवर संकट आले की तेथे धावुन जावून त्यांना शक्य होईल तेवढी मदत स्वखर्चातुन चंदन पाटील नागराळकर हे करतात. असेच गत ४ वर्षापूर्वी उदगीरकरांवर जलसंकट आले होते ते ही ऎन एप्रिल महिन्यात त्यावेळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती होती. त्यावेळी त्यांनी महामानवाला अभिवादन म्हणुन शहरातील विविध भागात १२५ टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा करुन उदगीरकरांची तहाण भागवली होती व आज कष्टकरी व निराधार नागरिकांसाठी एका आठवड्याचे राशन घरपोच दिल्याने चंदन पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत