शिक्षणात सांस्कृतिक उपक्रमाची आवश्यकता - तहसीलदार व्यंकटेश मुंडे
स्नेहसंमेलन: एकुर्का रोडच्या सरोज स्कूलचा उपक्रम
उदगीर : ग्रामीण विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर स्नेहसंमेलन सारख्या उपक्रमांना शाळांनी प्राधान्य दिले पाहिजे. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन उदगीरचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी शुक्रवारी येथे केले.
उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील न्यू सरोज इंग्लिश स्कूलचे दोन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी व शनिवारी येथे सायंकाळी पार पडले. पहिल्या दिवसाचे उदघाटक म्हणून उदगीरचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे तर अध्यक्षस्थानी दै. लोकमतचे उपसंपादक राजकुमार जोंधळे तसेच दुसऱ्या दिवसाचे उदघाटक म्हणून उदगीर शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल तर अध्यक्षस्थानी उदगीर तालुका संघटक विकास जाधव होते.
व्यासपीठावर एकुर्काचे सरपंच जगदीश जाधव, उपसरपंच राजकुमार कांबळे, अर्जुन पाटील, पोलिस पाटील विश्वास नरले, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पाटील, सेक्रेटरी रामकिशन जाधव, पत्रकार गणेश मुंडे, मु.अ. विठ्ठल शेवाळे, संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद कौडगावे, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, वाढवणा (खु.) चे सरपंच व्ंकट भिंगोले, समाजसेवक बालाजी बामणे, राहूल जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत, कोळी गीत, भक्तीगीत, नाटिका, मूक अभिनय
,स्टंट, हिंदी, मराठी वैयक्तिक व समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच मुक अभिनयातून सामाजिक संदेश दिला. यावेळी पालक, गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका चौगुणा शेवाळे, लखन घोनसे, मगरध्वज मुळे, हुसेन पटेल, राहुल घोणसे, अरुण मसुरे, अनिता घनसरे, आयशा डांगे, आरती लाळे, सविता उळागड्डे, शहनाज पठाण, बालाजी माने, राजाभाई आदींनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक विठ्ठल शेवाळे, सूत्रसंचालन लखन घोणसे तर आभार हुसेन पटेल यांनी मानले.