माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी दिला गोरगरीबांना आधार...
उदगीर : येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्या वतीने कोरोना व्हायरस मुळे संचारबंदीत गोरगरिब कुटुंबाच्या मदतीला धावुन त्यांना
आधार दिला आहे.
आज सकाळी दहा पासुन प्रत्येक कुटुंबाला
3 किलो गहू, 3 किलो तादूंळ, 1 किलो दाळ, 1 किलो साखर , चहापत्ती , बिस्किट पुडा व शंभर रुपयेचे वाटप करण्यात येत आहे.
उदगीर शहर व तालुक्यात गोरगरीबांच्या मदतीला नेहमीच धावणारे राजेश्वर निटुरे व त्यांचे चिरंजीव वडिलांचाच वारसा सांभाळत असणारे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे यांनी शहरातील अशोक नगर, किल्ला गल्ली, समतानगर, बनशेळकी रोड, गांधीनगर, संजय नगर, फुले नगर आदी भागातील गोरगरिब महिलांचा समावेश आहे.