पशुवैद्यकांना वन्यजिव क्षेत्रात व्यवसायांच्या अनेक संधी - डाॅ. नवनाथ निघोट

पशुवैद्यकांना वन्यजिव क्षेत्रात व्यवसायांच्या अनेक संधी - डाॅ. नवनाथ निघोट



   उदगीर : पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. रावजी मुगळे यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत ‘वन्यजिव विज्ञान’ या विषयावर नुकतेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज, पुणे येथील उपसंचालक डाॅ. नवनाथ निघोट यांनी अनुसुचित जातीच्या लाभार्थी विद्यार्थ्यासाठी आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करतांना म्हटले की, निर्विवाद पणे पशुसंवर्धन क्षेत्रात पशुवैद्यकांना नोकरी आणि व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत परंतु पशुवैद्यक विद्यार्थ्यानी शिक्षण घेत असतांना वन्यप्राणी विज्ञान क्षेत्रात अधिक रूची घेण्याची आवश्यकता असून वन्यप्राण्यांचे व्यवस्थापन, आहार, आरोग्य, आणि तत्सम बाबींबाबत ज्ञानार्जन व कौशल्य अधिग्रहित करावे. पशुवैद्यकाकडून दुर्लक्षित या क्षेत्रात अनेक संधी कौशल्यपूर्ण पशुवैद्यकांची प्रतिक्षा करीत आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डाॅ. अनिल भिकाने हे होते. डाॅ. भिकाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, या क्षेत्रात कार्य केल्यास अर्थार्जनासोबत काही नाविण्यतचे समाधान राहिलच आणि त्यासोबत जनमानसात पशुवैद्यकास लौकीक सुद्धा प्राप्त होईल.



व्यासपीठावर डाॅ. मंगेश वैद्य, समन्वयक, कौशल्य विकास केंद्र आणि डाॅ. एस. वाय. शिराळे, आयोजन समिती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. संभाजी चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक डाॅ. मंगेश वैद्य यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि लाभार्थी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डाॅ. एस. वाय. शिराळे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी डॉ नरेंद्र खोडे , डॉ सुधाकर आवंडकर, डॉ वकार अहमद, डॉ गोविंदप्रकाश चन्ना, डॉ प्रकाश घुले, डॉ राम कुलकर्णी, डॉ शरद दुर्गे सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image