जनतेने घाबरून जाऊ नये : राज्यमंत्री संजय बनसोडे
वाढवणा येथील आरोग्य केंद्राला भेटुन घेतला आढावा
उदगीर : सध्या जगात थैमान घातलेल्या कोरोना या रोगामुळे ग्रामीण भागात त्याचा परिणाम आणखी दिसत नाही परंतु जनतेने घाबरून न जाता खबरदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यानी वाढवणा येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
याभेटी दरम्यान मंत्रीमहोदयानी ग्रामीण भागातील जनतेने खबरदारी म्हणून काळजी घ्यावी तसेच स्वछता बाळगावी, शासनाने केलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी वाढवणा आरोग्य केंद्रांतर्गत 19 गावात सध्या पुणे, मुंबई सारख्या बाहेरच्या ठिकाणाहून आलेल्यांची संख्या 1150 असुन त्यांना कोरोना संबधी काळजी घेण्याचा व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा कानवटे यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी,
गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, माजी पं.स.सदस्य दत्ता बामणे, एपीआय बाळासाहेब नरवटे, डॉ. हरिदास, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे, डॉ. ऐश्वर्या पाटील,पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.