गोरक्षणसाठी निधी कमी पडू देणार नाही
: राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणार
उदगीर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतक-र्यासाठी विविध योजना राबवल्या जात असुन सोमनाथपुर येथील गोरक्षण ही संस्था गाईचे संरक्षण करुन संगोपण करत असुन त्यांच्या संगोपणासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी शासन स्तरावर आपण उपलब्ध करुन देवु असे मत राज्याचे पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील सोमनाथपुर येथील श्री गोरक्षण संस्थेच्या वतीने गाईसाठी नविन शेड, जलकुंभाचे जलपुजन, पर्यावरण पुरक गोकास्ट व गोपुजन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील नागराळकर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून डाॅ. रामप्रसाद लखोटिया,
डाॅ.अनिल भिकाणे, एस.टी. पाटील, पं.स. सदस्या श्रीमती पाटील, चंद्रकांत वैजापुरे, डाॅ.सतिश केंद्रे, भास्कर बोरगावकर, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, नायब तहसीलदार राजा खरात, महादेव नौबदे, बांधकाम विभागाचे देशपांडे, गजानन सताळकर, समीर शेख, राजीव वाघे, सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना डाॅ.रामप्रसाद लखोटिया यांनी गोरक्षणच्या विविध उपक्रमाची माहिती देत गोरक्षणच्या २०० एकर जमिनीपैकी ६० एकर जागा आता गोरक्षणसाठी उपलब्ध असुन ३० एकर जमिनीमध्ये हिरवे गवत लावणार आहे. गाईचे संगोपण करून विविध योजना राबवतोय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय गुडसुरकर यांनी केले तर आभार सुबोध अंबेसंगे यांनी मानले.