नगरसेवक मनोज पुदाले यांच्या पुढाकाराने भाजी विक्रेत्यांना मास्क व हँन्ड ग्लोजचे वाटप

नगरसेवक मनोज पुदाले यांच्या पुढाकाराने भाजी विक्रेत्यांना मास्क व हँन्ड ग्लोजचे वाटप



 शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनापासून बचावासाठी हँन्ड ग्लोज व मास्कचे वाटप करताना न.प. मुख्याधिकारी भारत राठोड, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले,  नगरसेवक मनोज पुदाले, अॅड. दत्ताजी पाटील , नगरसेवक मनोज पुदाले आदी दिसत आहेत.


    उदगीर : येथील भाजपाचे नगरसेवक
मनोज पुदाले यांच्या पुढाकारातून शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनापासून बचावासाठी हँन्ड ग्लोज व मास्कचे वाटप करण्यात आले.


शहरात सोशल डिस्टन्सइंगचा प्रयोग व त्या साठीची मार्किंग नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. ही मार्किंग व्यवस्थित कार्यरत आहे की नाही याची पाहणी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, अॅड . दत्ताजी पाटील यांनी केली . यावेळी नगरसेवक मनोज पुदाले यांच्या वतीने सर्व भाजीपाला विक्रीते यांना हॅन्ड ग्लोज व मास्कचे वाटप करण्यात आले . या वाटप प्रसंगी मार्किंग करून त्यांना समजून सांगावं लागत होतं सोशल डिस्टन्स ठेवणे किती गरजेचे आहे. यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत भाजीपाला विक्रेते व मेडिकल स्टोअर्स त्यां सर्वांना समजून सांगून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विनंती करण्यात आले. भाजीपाला विक्रेत्यांना घ्यावयाच्या काळजी संबंधी सूचनाही यावेळी करण्यात नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी राठोड यांनी दिल्या.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image