उदयगिरीचा ओमकार 'खेलो इंडिया' साठी रवाना
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा खेळाडू ओमकार साळुंखे हा दि. 26 फेब्रुवारीपासून भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या पहिल्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स' साठी नांदेड येथून रवाना झाला आहे. तो मैदानी स्पर्धा (अॅथलेटिक्स) खेळातील 20 कि. मी. चालणे या क्रीडा प्रकारात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ओमकार याने मूडबिद्री, कर्नाटक येथे झालेल्या 'ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप' मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच खेलो इंडिया स्पर्धेतही तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, अशी आशा विद्यापीठाने व्यक्त केली. या विद्यार्थ्यांला उदयगिरी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे , प्रा. रोहन ऐनाडले यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी म. ए. सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे व सर्व सदस्य तसेच प्रभारी प्राचार्य डॉ.आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी शुभेच्छा दिल्या.