वाढवणा पाटी वा्ट्स अँप ग्रुपने दिला लेकीनां 'आधार'
विधायक : समाजोपयोगी उपक्रमाची लोकचळवळ
उदगीर : तालुक्यातील वाढवणा बु.येथील व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांनी एकत्र येऊन वाढवणा पाटी नावाचा ' व्हा्टस ग्रुप'तयार केला.या ग्रुपने मागील चार वर्षात समाजोपयोगी विधायक उपक्रमाची लोकचळवळ उभी केली असुन यावर्षी च्या शिवजयंतीच्या निमित्ताने वाढवणा परिसरातील गरिब गरजु ,वंचित घटकातील लोकांना आर्थिक सहकार्य करण्यात आले. अध्यक्षस्थानी एपीआय बाळासाहेब नरवटे, प्रमुख पाहुणे विवेक सुकणे, विश्वनाथ काळे, मधुकर बिरादार, प्रा.शंकर बुड्डे,माधव कांबळे, प्रा.राजेंद्र कांबळे,ज्ञानेश्वर भांगे ,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना अनेक रोगापासून मुक्ती देणारे ,वाढवणा बु येथील आरोग्य केंद्राला सलग तिन वर्षे आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवून देणारे 'आरोग्यदुत'
डॉ. ओमप्रकाश कदम यांना सन्मान चिन्ह ,मानपत्र देऊन महाराष्ट्र भुषणने सन्मानित करण्यात आले.वाढवणा परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमठवणारे ,युवा उद्योजक, समाजसेवा, पत्रकारिता, शिक्षण,आदी क्षेत्रात यश संपादन करणारे दै.लोकमतचे उपसंपादक राजकुमार जोंधळे, कृष्णा मुळे,मारुती हासुळे, अक्षय हरनाळे, अंगद गोणपाट आदी गुणवंताचा यथोचित सत्कार करण्यात आला.
■
यावेळी अपर्णा कांबळे-शिक्षण ,प्रिती वाघमारे व भाग्यश्री शेवाळे आणि अंकिता बिरादार - लग्न ,आश्विनी बिरादार - वैद्यकीय, माधव क्षिरसागर- हलाखीचे जिवन , यांना प्रत्येकी एकवीस हजार रुपयांची मदत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
■ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वाढवणा पाटी वाट्स अँप ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी युवकांनी पुढाकार घेत जवळपास तिस जणांनी रक्तदान केले. यासाठी अंबरखाने ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन खरण्याचे कार्य केले.
■
यावेळी सत्कारमुर्ती डॉ. ओमप्रकाश कदम,राजकुमार जोंधळे यांनी मनोगतात आजच्या काळात असे समाजोपयोगी उपक्रम या ग्रुपने राबवून परिसरात आदर्श घालुन दिल्याचे मत व्यक्त केले.
याठिकाणी परिसरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या, निवृत्त झालेल्याचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सर्जेराव भांगे यांनी केले तर आभार बालाजी मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्यस यशस्वीतेसाठी पार पाडण्यासाठी अ्डमिन बालाजी बामणे, बालाजी बिरादार, उद्धव मुळे, विजयकुमार बिरादार(गुरुजी),व्यंकट उडतेवार, नारायण गाजरे, परमेश्वर कानवटे ,बालाजी आनलदास ,
अंगद मुळे आदी नी प्रयत्न केले.
यावेळी गोपीनाथ हाळीघोंगडे, सुर्यकांत हाळीघोंगडे,श्याम वाडकर, सुरेश हरनाळे, रामकिशन जाधव,सचिन बामणे, पप्पू हाळीघोंघडे, रसुल पठाण,नितीन गुंडरे,नारायण कौडगावे,हरिश बिडवे,ज्ञानोबा नारागुडे,जोतिर्मय मलशेट्टे,भैय्या पुंड,एकनाथ कनकुरे यांच्यासह ग्रुपचे सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.