भाजपाचे एल्गार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
उदगीर : भाजपाने महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात मंगळवारी दिनांक 25 रोजी उदगीर तहसील कार्यालय समोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालया समोर तंबूत भाजपाचे माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नागनाथ निडवदे, लातूर जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, जि.प. च्या महिला व बाल कल्याण सभापती ज्योती राठोड, पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील, माजी सभापती बाबुराव राठोड, बाबुराव बिरादार,
संजय पाटील, सुजित जीवणे, बसवराज रोडगे, उदयसिंग ठाकूर, पंचायत समितीच्या माजी सभापती सत्यकला गंभीरे, पंडित सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, रुपेंद्र चव्हाण, सतिश केंद्रे, बालाजी गवारे, अमोल निडवदे, संदिप निडवदे, शिवशंकर पांडे, दिलीप मजगे, संजय पाटील, शहाजी पाटील, सतिश राचुटे, सागर बिरादार, अमर पवार, गणेश गायकवाड, विरेश वळसणे, नामदेव आपटे, उत्तरा कलबुर्गे, वसंत शिरसे, नगरसेवक मनोज पुदाले, रामेश्वर पवार, बापूराव येलमटे, दत्ता पाटील, राजकुमार मुक्कावार, शंकर रोडगे, राजु सुर्यवंशी , शिवकर्णा अंधारे, वाहेद खुरेशी, डाॅ.चंद्रकांत कोठारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार राजकुमार खरात यांच्याकडे देण्यात आले.