अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करीयरची मोठी संधी - प्रा. सच्चिदानंद घोनसे
उदगीर : वेद्यकीय क्षेत्रापेक्षाही अभियांत्रिकी क्षेत्रात
रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून चांगल्या काॅलेजमधून इंजिनिअरींग केल्यास पॅकेज करोडो मध्ये मिळू शकते म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या करियरसाठी अभियांत्रिकी क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पहावेअसे मत महाराष्ट्रातील गणित या विषयाचे तज्ञ अहमदनगर येथील घोनसे मॅथस् अॅकॅडमीचे संचालक प्रा. सच्चिदानंद घोनसे यांनी व्यक्त केले.
ते उदयगिरी अॅकॅडमीतील इ.१० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अभ्यासासोबत अरोग्यही सांभाळावे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष , राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालूकाध्यक्ष प्रा. शिवाजी मूळे यांनी व्यक्त केले. उदयगिरी अॅकॅडमी म्हणजे गूणवंताची खाण असून येथून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या बूध्दीमत्तेच्या जोरावर मैलाचा दगड ठरलेले आहेत असे प्रतिपादन प्रा.प्रविण भोळे यांनी केले.
कार्यक्रमास प्रमूख पाहूणे म्हणून. प्रा. प्रदिप वीरकपाळे, प्रा. डाॅ. धनंजय पाटिल ,
प्रा. देविदास खिंडे, प्रा. मूरलीधर गवळी ,पत्रकार दिपक आंब्रे ,उदयगिरी अॅकॅडमीचा माजी विद्यार्थी डाॅ. निखील बिरादार आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमात उदयगिरी अॅकॅडमीतील नववी व दहावीतील ९५ % पेक्षा अधिक गूण घेणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.इ.१० वीतील विद्यार्थी प्रथमेश पाटिल , वरद मारावार, वैभव शेरे, तूषार मूळे, मिरा बेंजरेंगे यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उदयगिरी अॅकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी तर आभार प्रा. श्रीगण रेड्डी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अॅकॅडमीचे प्रा.संतोष पाटिल , प्रा.सौ ज्योति खिंडे, प्रा.सौ. प्रेरणा गवळी, प्रा.सौ. मिना हूरदाळे, सतिश माने, ईरशाद होनाळीकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.