श्री पांडुरंग विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयं शासन दिन आणि निरोप समारंभ कार्यक्रम

श्री पांडुरंग विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयं शासन दिन आणि निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी विद्या्र्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार व्यंकटेश मुुंडे. 


 


उदगीर : तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयं शासन दिन आणि निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उदगीरचे तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे व उदगीर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अंकुश चव्हाण, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे यांनी जीवनात यशस्वी बनण्यासाठी कठीण परीस्थिती सुद्धा मानवाला सक्षम बनवते. पुर्वी साधने नसतांना सुध्दा अनेक व्यक्ती यशस्वी झाले आहेत पण आज साधने असुन देखिल संस्कार लोप पावत चालले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणाविषयी गमतीदार गोष्टी सांगीतल्या.
गटविकास आधिकारी अंकुश चव्हाण, 
यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय मोठे ठेवा, कठोर परीश्रम घ्या आणि सातत्याने प्रयत्नशील रहा, परीश्रम करणारेच व्यक्ती वंदनीय असतात. कष्टाशिवाय फळ नाही जीथे इच्छा असेल तेथे मार्ग सापडतोच असे त्यांनी गोष्टीच्या स्वरूपात मनोरंजनात्मक पद्धतीने सांगीतले.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी
स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक देवकते मारूती संजय आणि उपमुख्याध्यापीका कुंडगीर स्नेहल रमेश यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे हे होते त्यांनी आध्यक्षीय समारोपात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतांना जीवनात शिस्त, नीटनीटकेपणा, संस्कार, चारीत्र, नम्रता,सदाचार हे गुण नेहमी उपयोगी पडतात. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच संस्कारसुध्दा जपा व आपल्या आई वडीलांची काळजी घ्या असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ. नादरगे एस.व्ही. यांनी केले. सुत्रसंचलन देवकते तर आभार केंद्रे डी.पी. यांनी मानले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image