चुकीच्या परीक्षा पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन

चुकीच्या परीक्षा पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन



उदगीर  : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या चुकीच्या परीक्षा पॅटर्न पद्धतीमुळे विद्यापीठातील सर्व विभागाचे जवळपास 95% विद्यार्थी नापास झाले आहेत. याच्या विरोधात संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडली होती पण या विद्यार्थ्यांना एक सक्षम नेतृत्व नसल्यामुळे यांच्या मागण्यांकडे ना कुलगुरू लक्ष देत होते न राज्य शासन याची माहिती राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे यांना कळताच त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात आंदोलन केली होती पण त्यांच्या पदरी निराशा आली होती अशा विद्यार्थ्यांना बोलून त्यांची मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिली व तात्काळ मुंबई येथील उच्च व तंत्रशिक्षणमंत्राच्या निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व या परीक्षा पद्धतीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते असे विद्यार्थी यांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीमध्ये 
1) एका दिवशी एकाच पेपर होणार


2) पुनरमूल्यांकणाची फिस माफ होणार


3) निकाल लवकर लागून फेरपरिक्षा लवकरच होणार


4) विद्यापीठातील भविष्यातील सर्व निर्णय विद्यार्थ्यांना विचारात घेऊन व विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच घेतले जाणार या प्रमुख चार मागण्या मान्य करण्यात सहमती दर्शविण्यात आली आहे.
  यावेळी विद्यार्थी युवासेनेचे जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी,विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव, राहुल मातोळकर, रवी पिचारे, ऋषिकेश शेटे, संतोष माने व विद्यार्थी रामराजे काळे, चेतन पाटील, अभिजित कसपटे, अभिजित चव्हाण, अनिकेत पाटील, कृष्णा जाधव उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image