संस्कारक्षम पिढी निर्माण होणे काळाची गरज -  मदन धुमाळ

 


संस्कारक्षम पिढी निर्माण होणे काळाची गरज -  मदन धुमाळ 



उदगीर : शिक्षण गुणवत्तेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे परंतु संस्कार मात्र दिवसेंदिवस कमी होत चालले असून उद्दिष्ट प्राप्तीसाठी नीतिमूल्यांची अवलंब करणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात होत असून या जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी परिश्रम घेत आहेत ही बाब खरी असली तरी संस्कार कमी होत चाललेले आहेत ही बाबा चिंता जनक आहे वडिल धारी मंडळी चा आदर करणे गुरुजनांचा आदरया गोष्टी विद्यार्थ्याकडून अतिशय कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत म्हणून संस्कार क्षम पीढ़ी निर्माण होने  ही आजची खरी गरज आहे.


तालुक्यातील संत सावतामाळी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. हलगरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील शाळेचे प्राचार्य  शिवहार रोडगे आदी मंचावर उपस्थित होते.


पुढे बोलताना धुमाळ यांनी शिक्षण गुणवत्तेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे परंतु संस्कार मात्र दिवसेंदिवस कमी होत चालले असून उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितीमूल्यांचा अवलंब करणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात होत असून या जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ही बाब खरी असली तरी संस्कार कमी होत चाललेले आहेत . ही बाब चिंता जनक आहे वडिल धारी मंडळीचा आदर करणे गुरुजनांचा आदरया गोष्टी विद्यार्थ्याकडून अतिशय कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत म्हणून संस्कार क्षम पीढ़ी निर्माण होने ही आजची खरी गरज आहे.


याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना एस. एस. हलगरकर यांनी भविष्यवेध घेऊन विद्यार्थ्यांनी दहावीनंतर शाखा निवड करावी अशी अपेक्षा व्यक्त करून एसएससीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक रोडगे यांनी सलग तीन वर्ष दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान प्रदर्शनामध्ये सतत सात वर्ष शाळांनी तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठीही या शाळेची निवड झाली होती असेही त्यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा गुणवत्ता वाढीचे काम या शाळेमधून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती भांडे यांनी केले तर आभार कांबळे यांनी मानले.


कार्यक्रमास शाळेतील शिक्षक जाधव डी.एम., कदम एम. एम., कांबळे एम. एन. , होडगे एस.आर., फुले जी.व्ही.,  सौ.सुरवसे , बंडे पी.एम.,  विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image