सामाजिक जडणघडणीत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे : राज्यमंत्री बनसोडे

उदगीर : देशाच्या व समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून आगामी काळात राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनीक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठवाडा स्तरीय पुरस्काराचे वितरण शनिवारी शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोने, नामदेवराव चामले, भीमाशंकर मुद्दा, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे उपस्थित होते.


यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, एक छोटा कार्यकर्ता ते राज्यमंत्री पदापर्यंत आपण केवळ पत्रकारांच्या सहकार्यामुळे पोहोचलो असल्याचे सांगत उदगीरच्या विविध क्षेत्रातील विकास साधण्यासाठी पत्रकारांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. उदगीरच्या पत्रकारांची प्रमुख मागणी असलेला पत्रकार भवनांचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.


यावेळी अध्यक्षीय समारोपात सिद्धेश्वर पाटील यांनी उदगीरच्या पत्रकारांनी नेहमीच निःपक्षपाती पत्रकारिता केली असल्याचे सांगत स्व. गुणवंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयाचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले


यावेळी २०१८, २०१९ या दोन वर्षातील शोध वार्ता व उत्कृष्ट वार्ता गटातील पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले तर आभार दयानंद बिरादार यांनी मानले.


 


सा.जनस्तंभचे संपादक सिध्दार्थ सुर्यवंशी यांना मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, भुकंप पुर्नवसन, पाणीपुरवठा व संसदीय कार्य राज्यमंत्री संजयजी बनसोडे व आदी मान्यवर दिसत आहेत.



Popular posts
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image
पाणीपुरवठा योजनांचा सुधारीत प्रस्ताव 15 दिवसात विभागाला सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश
Image
ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली केली कार्यवाही
Image