जिव्हाळाच्या वतीने ' मराठी राजभाषा दिन ' साजरा

जिव्हाळाच्या वतीने ' मराठी राजभाषा दिन ' साजरा



उदगीर : मराठी राजभाषा दिन तथा साहित्यिक, कविवर्य वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस  जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या वतिने उत्साहाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक, लेखक ,कवी  श्री रमाकान्त बनशेळकीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिव्हाळा ग्रुपचे लेखक-कवी ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, मसाप उदगीरचे सचिव, साहित्यिक सुधाकर वायचळकर नवोदित साहित्यिक,कवी  सुभाष तगाळे, लक्ष्मीकांत बिडवई  मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे   व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष  देविदास नादरगे यांनी केले.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंत जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. या कुसुमाग्रजांच्या काव्य पंगतीने मा. श्री मुडपे गुरुजींनी कवितांची सुरुवात केली कवी सुभाष तगाळे यांनी 
माझ्या मराठीची बोलू कौतुके. परी अमृतातेही पैजासी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन .. या ज्ञानेश्वरांच्या काव्यपंक्ती सोबतच" मी चाललो शोधण्यास मला" ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कविवर्य लक्ष्मीकांत बिडवई यांची मैत्री कविता व विवेक होळसबंरे यांची सीमावाद ही कविता सर्वांचेच लक्ष वेधून घेतली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात  बनशेळकीकर यानी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन प.स. विस्तार अधिकारी उत्तमराव केंद्रे  यांनी केले तर आभार  प्रा डॉ.अनिल भिकाने यांनी मानले.
प्रसंगी जिव्हाळ्याचे चंद्रकांत रोडगे , अमृतराव देशपांडे ,सिंदबंदगीकर, वैजनाथ पंचगल्ले , सोपानराव माने,प्रभाकर कुलकर्णी,शरणप्पा  खेळगे,चंद्रकांत उप्परबावडे, विश्वनाथराव माळेवाडीकर,  हरिश्चंद्र वट्टमवार,प्रा चंद्रकांत भद्रे, ज्ञानोबा कोटलवार, दयानंद शिवशेट्टे. राजकुमार बिरादार , रमेश खंडोमलके,श्री  पांडूरंग बोडके, श्री दशरथ शिंदे, संजय कानगुले उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image