मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज - गोविंदराव भुरे
उदगीर : मराठी भाषा आमची मायबोली आहे. टिकविण्याचे तिचा विकास करण्याचे काम आपणा सर्वांचे आहे. सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे उद्गार राष्ट्रपती पुरस्कार विजेते कवी गोविंदराव भुरे यांनी काढले. येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाने मराठी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य. डॉ .एल.एच.पाटील होते तर प्रमुख उपस्थिती मराठी विभाग प्रमुख डॉ .एस .व्ही. शिंदे, डॉ. नरसिंग कदम यांची होती.
पुढे बोलताना भुरे म्हणाले आपण आपल्या बोलण्याच्या माध्यमातून सतत मराठीचा वापर करावा. नोकरीसाठी इतर भाषा शिकावी लागते म्हणून मराठी भाषेकडे दुर्लक्ष करू नये. यावेळी त्यांनी पाळणा, पोवाडा व कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून डॉ.एस.व्ही. शिंदे यांनी मराठीची महती संतापासून चालत आलेली आहे असे सांगितले तर डॉ. नरसिंग कदम म्हणाले मराठी आमची मायबोली आहे. आम्ही चालतो मराठी , बोलतो मराठी तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी डाॅ.एल.एच.पाटील म्हणाले मराठी आमचं भूषण आहे. आपण सर्वांनी तिची थोरवी गावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गायकवाड देविदास तर आभार प्रतीक्षा वाडकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.