पत्रकारिता पुरस्काराची रक्कम ' त्या ' चिमुकल्यांसाठी मदत !
वेदनाशी नाते सांगत पत्रकार बिभीषण मद्देवाड यांनी जोपासली संवेदना...
उदगीर : पत्रकार बिभीषण मद्देवाड यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय पुरस्कार मिळाला. ज्या दांम्पत्याच्या विवाहाच्या बातमीस पुरस्कार मिळाला होता. त्या कुंटूबाविषयी संवेदना जागवत ' त्यांच्या ' चिमुकल्यांसाठी पुरस्काराची रक्कम मदत दिली.
दु:ख वेदना आश्रूंना आधार देणारा शुभ ' विवाह ' थोरल्याच्या चिमुकल्यांसाठी धाकल्याचा निर्णय, या बातमीला बिभीषण मद्देवाड यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्काराची रक्कम दिपाली यांचे प्रेम व प्रतिक या चिमुकल्यांना मदत दिली. ज्यांच्या बातमीमुळे पुरस्कार मिळाला त्यांच्या दु:ख वेदनाशी नाते सांगत बिभीषण मद्देवाड यांनी संवेदना जोपासली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील , जेष्ट पत्रकार ह.भ.प सुरेश पाटील नेत्रगावकर, अॅड. विष्णू लांडगे, पत्रकार सुनिल हावा , श्रीनिवास सोनी , सिध्दार्थ सुर्यवंशी, माधव रोडगे, बस्वेश्वर डावळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.सौ.अश्विनी देशमुख यांनी केले तर आभार उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी यानी मानले.